Tuesday, January 26, 2021 | 07:49 PM

संपादकीय

लोकशाहीचा आत्मा जपावा

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच निधन
ठाणे
06-Dec-2020 02:28 PM

ठाणे

ठाणे,

 ज्येष्ठ मराठी अभिनेते रवी पटवर्धन यांचे वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाटकासह सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. गेली पन्नास वर्षे त्यांनी मराठी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून मनोरंजन करण्याचं काम केलं. अग्गंबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली. या मालिकेत त्यांनी बबड्याचे आजोबा ही भूमिका निभावली.

 भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ङ्गपाटीलफ, ङ्गपोलीस आयुक्तफ, ङ्गन्यायाधीशफ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका भूमिका मिळत गेल्या असल्या तरी त्यांनी नाटकांत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. दूरदर्शनवरच्या ङ्गआमची माती आमची माणसंफ या कार्यक्रमात प्रसारित झालेल्या आणि अमाप लोकप्रियता मिळालेल्या ङ्गगप्पागोष्टीफमुळे पटवर्धन यांचा चेहरा घराघरांतला पोहोचला. यातील त्यांनी साकारलेला ङ्गवस्ताद पाटीलफ प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहतील. सहाव्या वर्षी रवी पटवर्धन यांनी नाटकात पाऊल ठेवलं होतं. 1944 मध्ये झालेल्या नाट्यमहोत्सवात त्यांनी एका बालनाट्यामध्ये भूमिका केली होती. या नाटट्यमोत्सवाचे अध्यक्ष होते बालगंधर्व तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा 1974 मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या 82 व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत आहेत. वयपरत्वे येणार्‍या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले.

 1971 मध्ये प्रदर्शित झालेला ङ्गअशा असाव्या सुनाफ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. ङ्गसिंहासनफ, ङ्गउंबरठाफ, ङ्गबिनकामाचा नवराफ ते अगदी अलीकडचा ङ्गहरी ओम विठ्ठलाफ हे पटवर्धन यांचे चित्रपट. जवळपास 100 मराठी चित्रपटांतून त्यांनी काम केले आहे. एन. चंद्रा यांच्या ङ्गअंकुशफ, ङ्गप्रतिघातफ, ङ्गतेजाबफ, ङ्गनरसिंहाफ, ङ्गहमलाफ हे आणि इतर अनेक चित्रपट केले. व्ही. शांताराम यांच्या ङ्गझंजारफ या चित्रपटात त्यांना एक छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली होती.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top