Wednesday, May 19, 2021 | 01:08 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सहा वर्षे रखडलेली मेट्रो डिसेंबरमध्ये धावणार
ठाणे
23-Feb-2021 07:39 PM

ठाणे

नवी मुंबई । प्रतिनिधी ।

बेलापूर ते पेंधर मेट्रो रेल्वेचे रखडलेले काम सिडको महा मेट्रोला देणार असून या कामाचा करार मंगळवारी (ता.23) झाला. या करारानुसार डिसेंबरला पेंधर ते सेंट्रल पार्क दरम्यान धावणार असून डिसेंबर 2022 अखेर पर्यंत बेलापूर ते पेंधर मेट्रो रुळावर धावेल अशा पद्धतीने सिडकोने नियोजन केल्याचे सिडको अधिकार्‍यांनी सांगितले.

बेलापूर पेंधर मेट्रो सुरू होण्याच्या चार वेळा तारखा जाहीर करूनही आतापर्यंत न धावणारी सिडकोची नवी मुंबई मेट्रो येत्या डिसेंबरमध्ये धावणार आहे. सहा वर्षे रखडलेले या सेवेचे काम संथगतीने सुरू असल्याने सिडकोने सर्व कंत्राटदारांना हटवून त्या जागी महा मेट्रोला हे काम दिले आहे. या कामाचा लेखी करार मंगळवारी करण्यात आला.

बेलापूर ते पेंधर या अकरा किलोमीटर मार्गातील स्थापत्य कामे ही नव्वद टक्के पूर्ण झाली आहेत. मात्र विद्युत, माहिती तंत्रज्ञान आणि तांत्रिक कामे अद्याप शिल्लक आहेत. मेट्रो रेलमध्ये सर्वात महत्त्वाची डक्ट लाइन टाकण्याचे काम असून सिडकोने शीव पनवेल मार्गावरील उड्डाणपूल देखील या डक्टने जोडला आहे. त्यामुळे तांत्रिक आणि विद्युत कामांचे आव्हान आता शिल्लक आहे.सिडकोने हे काम आता ङ्गमहामेट्रोफला देण्याचा निर्णय घेतला आहे. ङ्गमहामेट्रोफने नागपूर व पुण्यातील मेट्रो मार्गाना चांगली गती दिली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात मेट्रो पेंधर ते सेंट्रल पार्क दरम्यान सुरू करण्यात येणार असून दुसर्‍या टप्प्यात डिसेंबर 2022 पर्यंत बेलापूर पेंधर मेट्रो मार्ग सुरू करण्यात येणार असल्याचे सिडको अधिकार्‍यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top