Friday, March 05, 2021 | 07:16 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

नवी मुंबईत लहान मुलांसाठी मोफत ‘हृदय तपासणी शिबीर’
ठाणे
23-Feb-2021 04:01 PM

ठाणे

नवी मुंबई | वार्ताहर

रिलायन्स हॉस्पिटल नवी मुंबईने 0-18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी निःशुल्क ‘हृदय तपासणी’ शिबिराचे आयोजन शुक्रवार, 26 फेब्रुवारी रोजी केले आहे.

या शिबिरात हृदयविकार, यापूर्वी सर्जरी झालेल्या, ज्यांच्या हृदयामध्ये काही संशयास्पद स्थिती उत्पन्न झाली आहे किंवा ज्या मुलांना श्‍वसनाच्या समस्या आहेत, अशा सर्व मुलांची तपासणी करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून शिबिरास सुरुवात होईल. तसेच 2 डी इको व फीटल इको या सेवा निःशुल्क पुरवविण्यात येतील, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

मुलांमधील कार्डिओलॉजिकल समस्यांबाबत जागरूकता, माहिती वाढवणे व हृदयाच्या समस्या असलेल्या मुलांसाठी सर्वात चांगल्या उपचारांचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत याबाबत माहिती मिळवण्यात पालकांची मदत करणे हा या शिबिराचा उद्देश आहे.

या शिबिराच्या आयोजनामध्ये कोविड-19 संदर्भात सर्व आवश्यक काळजी घेतली जाईल. शिबिराला येणार्‍या प्रत्येक व्यक्तीने कृपया मास्क घालावा, ते अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रिलायन्स हॉस्पिटल, ठाणे-बेलापूर रोड, कोपरखैरणे स्टेशनसमोर, धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीच्या बाजूला, नवी मुंबई, संजय कोळेकर 7304467773 यांच्याशी संपर्क साधावा.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top