Tuesday, April 13, 2021 | 12:44 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

कल्याण डोंबिवलीत आयुक्तांची रस्त्यावर उतरुन पाहणी
ठाणे
19-Feb-2021 04:42 PM

ठाणे

 । कल्याण । वृत्तसंस्था ।

 कल्याण डोबिंवलीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांनी प्रशासनाची चिंता वाढवली आहे. नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हीच संख्या रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त प्रत्यक्ष फिल्डवर उतरुन कामाला लागले आहेत. 

नागरिक आणि दुकानदार नियम पाळत करत आहेत की नाही हे पाहण्यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी हे बाजारात गेले. दुकानात जाऊन त्यानी परिस्थितीचा आढावा घेतला. अजूनही काही दुकानदार मास्क वापरत नाहीत हे दिसून आल्यानंतर त्यांच्या विरोधात आयुक्तांनी दंडात्मक कारवाई केली. तसंच जे नागरिक यापुढे नियमांचं पालन करणार नाहीत, त्यांच्याविरोधत असाच कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.गेल्या दोन दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीत कोव्हिड रुग्णांची संख्या 100 च्या वर आढळून आली आहे. तसंच कोरोना संसर्ग काळातपासून आतापर्यंत जवळपास 62 हजार रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 1152 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आहे. आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने कंबर कसली आहे.कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे. शासनाने घालून दिलेले नियम नागरिकांनी पाळायला हवेत. जर नियम पाळले तर लॉकडाऊनची गरज भासणार नाही. लोकांनी गांभीर्य ओळखून नियम पाळावेत आणि कोरोनापासून लांब रहावं, असं आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top