ठाणे 

ठाणे पश्‍चिमेकडील रेती बंदरच्या पुलावरून तेथील खाडीत कंटेनर कोसळल्याची घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच कळवा पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून एका बोटीच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे.खारेगाव टोलनाक्यापासून काही अंतरावर सकाळी पावणे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त कंटेनरचा क्र. एमएच 04 एचवाय 8691 असा असून हा कंटनेर राजेंद्र घोरपडे यांच्या मालकीचा आहे. रमेश पांडे (वय 55) नावाचा चालक हा कंटेनर घेऊन भिवंडीहून न्वाहा शेवाकडे निघाला होता. रेतीबंदर पुलाचा संरक्षक कठडा तोडून हा कंटेनर खाडीत कोसळला. गाडीचा चालक पांडे याला वाचवण्यात यश आलं असून त्याला माजिवडा येथील परम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघाताचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही.

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त