सातारा 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काहीही बोलून प्रसिद्ध मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.सध्या त्यांना भरपूर वेळ आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सातार्‍यात विरोधी पक्षनेते फडणवीस यांना लगावला आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचीच ऑफर होती असे बोलून फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची आमच्यासोबत येण्याची इच्छा होती असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यासंदर्भात काही चर्चाही झाल्या होत्या. मात्र भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांनी त्यावेळी सांगितलं की शिवसेना सोडून हे आपल्याला करता येणार नाही. शिवसेना सोबत राहून जर राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं असेल तर घेऊ असंही तेव्हा ठरलं होतं. चर्चा बर्‍याच पुढे गेल्या होत्या मात्र नंतर ते सगळं प्रकरण थंड बस्त्यात गेलं असं देवेंद्र फडणवीस यांनी  पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.

आज शरद पवार हे सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेल असताना त्यांनी, पत्रकारांशी बोलताना यावर भाष्य केल्याचे दिसले. सातार्‍यात ते रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

अवश्य वाचा

एक गूढकथा संपली!