Tuesday, January 26, 2021 | 09:31 PM

संपादकीय

लोकशाहीचा आत्मा जपावा

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत

सावधान! शरद पवार आले अ‍ॅक्शन मोडमध्ये!
सातारा
18-Dec-2020 04:42 PM

सातारा

सातारा । वृत्तसंस्था । 

कर्मवीर भाऊराव पाटलांनी गरीब, वंचितांसाठी ज्या शिक्षण संस्थेची कवाडं खुली केली, तीच ही रयत शिक्षण संस्था आशियातील सर्वात मोठी संस्था म्हणून ओळखली जाते. मात्र आता या शिक्षण संस्थेत सध्या प्राध्यापक भरती घोटाळ्याचा गंध येत असल्याने, स्वत: पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेली रयत शिक्षण संस्था दोन पदाधिकार्‍यांच्या राजीनाम्याने चर्चेत आहे. केवळ दोन पदाधिकार्‍यांचे राजीनाम्याने फरक तो काय? असा प्रश्‍न पडू शकतो. मात्र ज्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत, त्यांच्या संस्थेतील पदाधिकार्‍यांचा तडकाफडकी राजीनामा घेणं आणि त्या डॅमेज कंट्रोलसाठी खुद्द शरद पवारांना सातार्‍यात जावं लागणं यावरुन या प्रकरणाची व्याप्ती लक्षात येऊ शकते. रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव भाऊसाहेब कराळे यांनी पुण्यात, तर माजी सचिव अरविंद बुरुगले यांनी सातार्‍यात रयत काऊन्सिलिंगच्या बैठकीत राजीनामा सोपवला. कर्मवीर भाऊरावांच्या कडक शिस्तीची अदृश्य काठी घोटाळेबाजांच्या माथी बसलीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका काही सदस्यांनी घेतली आहे.

 रयत शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक भरती प्रक्रियेबाबत लोकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने बुधवारी (16 डिसेंबर) पुण्यात माजी सचिव भाऊसाहेब कराळे यांचा राजीनामा संस्थेने घेतला होता. त्यानंतर काल गुरुवारी झालेल्या बैठकीत या विषयावर महत्वपूर्ण चर्चा पार पडली.

सातारा येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत माजी सचिव अरविंद बुरुंगले यांचाही राजीनामा घेतल्यामुळे, रयत शिक्षण संस्थेत पुन्हा एकदा हा प्राध्यापक भरतीचा विषय चर्चेत आला आहे. मात्र यावेळी शरद पवारांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त करीत, अनेकांची कानउघाडणी केली. या प्रकरणावर संस्थेतील कोणही बोलण्यास तयार नसल्याने, राजीनाम्याबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. या बैठकीला मात्र प्रसारमाध्यमांना पूर्णपणे मज्जाव केला होता.

भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार?

पदाधिकार्‍यांच्या राजीनाम्याचं मूळ हे प्राध्यापक भरती प्रकरणात आहे. पुण्याचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ, कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ या कार्यक्षेत्रात गेल्या वर्षी प्राध्यपक भरती झाली. मात्र याच भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. या आरोपात कितपत तथ्य आहे हे कालांतराने समोर येईल. ज्या प्राध्यापकांनी संस्थेसाठी काम केलं, त्यांची सेवा ज्येष्ठता डावलून ङ्गभलत्याचफ प्राध्यापकांची रयतमध्ये निवड केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच जे पात्र होते, ज्यांची सेवाज्येष्ठता होती, त्यांना डावललं म्हणजे काहीतरी आर्थिक गडबड आहे, असा काही सदस्यांचा आरोप आहे. त्यावरुनच माजी सचिव भाऊसाहेब कराळे आणि माजी सचिव अरविंद बुरुंगले यांचे राजीनामे घेण्यात आले.

नेमके आरोप कोणते?

ज्या दोन पदाधिकार्‍यांचे राजीनामे घेतले आहेत, त्यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. माजी सचिव डॉ. बी के कराळे आणि माजी सचिव अरविंद बुरुंगले यांनी पदांचा गैरवापर केल्याचा आरोप आहेच. पण त्याशिवाय त्यांनी प्राध्यापक भरतीत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. पदावर असताना काहींना हाताशी घेऊन त्यांचा बुद्धीबळातील सोंगट्यांप्रमाणे वापर केला. जे ऐकतील त्यांना प्रेमाने, जे ऐकणार नाहीत त्यांना पैशाने अशापद्धतीने साम-दाम-दंड भेद वापरुन आपली पोळी भाजली असा आरोप करण्यात आला आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top