Tuesday, January 26, 2021 | 08:09 PM

संपादकीय

लोकशाहीचा आत्मा जपावा

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत

विहिरीत पडलेल्या त्या गव्याची सुखरूप सुटका
सातारा
12-Jan-2021 04:56 PM

सातारा

 । सातारा । वृत्तसंस्था ।

महाबळेश्‍वर येथील ग्रीन वूड सोसायटीतील विहिरीत पडलेल्या रानगव्याला तब्बल आठ तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्र कोल्हापूर, ममहाबळेश्‍वर ट्रेकर्सफची टीम, वन विभाग व सह्याद्री प्रोटेक्टर्सच्या प्राणिमित्रांना यश आले आहे.

महाबळेश्‍वरपासून चार किलोमीटर अंतरावरील ग्रीन वूड सोसायटीतील विहिरीत काल दुपारी गवा पडला होता. ममहाबळेश्‍वर ट्रेकर्सफकडून या गव्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात होते. कोल्हापूर येथील टीमला येण्यासाठी वेळ लागणार असल्याने ट्रेकर्स टीमने एका बाजूची विहिरीवरील लोखंडी जाळी वेल्डिंगच्या साहाय्याने कापून विहिर मोकळी केली. अंधार पडल्यानंतर महाबळेश्‍वर पालिकेच्या अस्का लाइट्सच्या मदतीने बचावकार्य सुरू राहिले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयसिंग सिसोदिया, डॉ. संदीप आरडे, डॉ. विकास महाजन हेदेखील येथे पोहोचले. भुलीचे इंजेक्शन देण्याची सुरुवात झाली.

रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर येथील वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्र टीम, वनवृत्त विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर व स्वयंसेवक, वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ऍण्ड रिसर्च सोसायटी, इंडिया, वन्यप्राणी संवर्धन आणि संशोधन फाऊंडेशन, इचलकरंजी सह्याद्री प्रोटेक्टर्सचे प्रदीप सुतार, अल्मतीन बांगी, विशाल पाटील, ओंकार पाटील यांची टीम घटनास्थळी पोहोचली. प्रदीप सुतार यांनी विहिरीत उतरून या गाव्याला भुलीचे इंजेक्शन दिले. विहीर व परिसरातील गर्दी वन विभागाने हटविली. त्यानंतर विहिरीनजीक असलेली लोखंडी जाळी कापून जंगलात जाणारी वाट मोकळी करण्यात आली. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने या गव्याला विहिरीबाहेर काढण्यात आले. बाहेर पडताच या रानगव्याने जंगलाकडे धूम ठोकली.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top