Monday, January 18, 2021 | 04:42 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

...त्याने माझ्यासमोरच केले तीन खून
सातारा
20-Dec-2020 03:35 PM

सातारा

सातारा । वृत्तसंस्था 

वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने शनिवारी सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी संतोष पोळ याने ‘माझ्यासमोर मंगला जेधे, सलमा शेख, भंडारी यांचा इंजेक्शन देऊन खून केला. या घटनेनंतर त्याने आनंद व्यक्त केला. तसेच बहुतेक खून हे पोळने सोने व पैशाच्या हव्यासापोटी केले,’ अशी साक्ष न्यायालयात दिली. 

दरम्यान, आता पुढील सुनावणी दोन जानेवारी रोजी होणार आहे. सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र व देशात हादरवणार्या वाई-धोम हत्यांकाड खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे काम पाहत असून शनिवारी ते न्यायालयात उपस्थित होते. माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने पोळच्या सांगण्यावरून आपणच मंगला यांना पोळच्या पोल्ट्री फार्मवर आणल्याचेही तिने यावेळी सांगितले. शनिवारी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी ज्योतीची साक्ष घेतली. त्यानंतर पोळचे वकील श्रीकांत हुडगीकर यांनी उलट तपासणीला सुरुवात केली.

परंतु न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्याने पुढील सुनावणी दोन जानेवारीला होणार आहे. दरम्यान, पोलिसांनी सुनावणीवेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर खटल्याच्या कामकाजाशी संबंधितांशिवाय इतर कोणालाच न्यायाधीशांच्या दालनात प्रवेश नव्हता.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top