Tuesday, January 26, 2021 | 09:40 PM

संपादकीय

लोकशाहीचा आत्मा जपावा

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत

सातारा पुणे महामार्गावर भीषण अपघात
सातारा
25-Nov-2020 01:30 PM

सातारा

सातारा पुणे महामार्गावर कात्रज आंबेगाव येथे पहाटे 8 वाहने एकमेकांवर धडकल्याने भीषण अपघात झाला. त्यात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत़ अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या सहाय्याने गाड्या बाजूला करुन आतील वाहनचालकांची सुटका केली़ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती अशी, साता-याहून पुण्याकडे येणार्या दरी पुलानंतर अनेक ठिकाणी मोठा उतार आहे. कात्रज आंबेगाव येथील स्वामी नारायण मंदिराजवळही असाच एक तीव्र उतार आहे. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक ट्रक दगड घेऊन सातार्याकडून पुण्याकडे येत होता. त्याला मागून आलेल्या ट्रकने पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामुळे ही दोन्ही वाहने रस्त्यात अडकून पडली. त्याच्या मागोमाग आलेल्या वाहनांना ही रस्त्यातील वाहने दिसली नाही. त्यांनी एका पाठोपाठ पुढच्या वाहनांना धडक दिली. येथे उतार असल्याने अचानक समोर वाहन दिसल्यावर मालट्रकचा वेग कमी करता येत नाही.

परिणामी ते पाठीमागून पुढच्या वाहनाला जाऊन धडकतात.या दोन ट्रकच्या मागून एक कार येत होती. तिने पुढच्या ट्रकला जोरात धडक दिली. ही वाहने एकमेकात अडकली. त्यामुळे कारमधील दोघे आणि ट्रकचालक हे आतमध्ये अडकून पडले होते. पुणे अग्निशामक दल आणि पीएमआरडीएचे अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी क्रेनद्वारे ही वाहने बाजूला करुन आतील जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघातात 2 कार आणि 6 ट्रक एकमेकांना काही काही अंतरावर धडकले आहेत.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top