रत्नागिरी  

रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या 16 वर्षीय मुलीवर लैगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आह़े पीडित मुलगी पाच महिन्यांची गरोदर असून, याप्रकरणी जिल्हा बालसंरक्षण अधिकारी समृद्धी वीर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आह़े

पोलिसांनी या मुलीकडे चौकशी केली असता तिने रुग्णालयातील शिपाई काका इतकेच उत्तर दिले. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात कर्मचार्‍याविरूद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आह़े  या घटनेमुळे प्रादेशिक मनोरुग्णालयातील उपचार घेत असलेल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आह़े

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला 31 मे 2019 रोजी जिल्हा बालकल्याण समितीसमोर आणण्यात आले होते. या मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता पीडिता मानसिक रुग्ण असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार या मुलीला 08 जुलै ते 31 डिसेंबर 2019 दरम्यान जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होत़े मनोरुग्णालयातील उपचारानंतर पीडित मुलीला माहेर संस्थेच्या बालसुधारगृहात ठेवण्यात आल़े  यावेळी तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिची सोनोग्राफी करण्यात आली असता ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निदर्शनास आल़े

या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा बाल संरक्षण अधिकार्‍यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून पीडित मुलीकडे चौकशी केली असता तिने रुग्णालयातील शिपाई काकांनी आपल्यासोबत अत्याचार केल्याचे सांगितल़े  पीडीतेने आरोपीचे नेमके नाव व ओळख न सांगितल्याने पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला आह़े 

 

अवश्य वाचा