Friday, March 05, 2021 | 07:19 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सावर्डेत राज्यस्तरीय आमदार चषक क्रिकेट स्पर्धाचे आयोजन
रत्नागिरी
22-Feb-2021 05:39 PM

रत्नागिरी

चिपळूण । प्रतिनिधी ।

तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री क्रीडा संकुल येथे यंग बॉईज क्रिकेट क्लब आयोजित आमदार शेखर निकम 2021 चषक क्रिकेट स्पर्धा दिनांक 24 ते  26 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघास 1 लाख 50 हजार रुपये व स्वर्गीय गोविंदराव निकम स्मृती चषक, उपविजेत्या संघास 75 हजार रुपये व स्वर्गीय बाळकृष्ण पवार स्मृती चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सावर्डे येथे राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा गेली तीस वर्ष या मैदानावर यंग बॉईज क्रिकेट  क्लब कडून भरवल्या जातात. पंचक्रोशीतील खेळाडूंना एक चांगलं क्रिकेट बघण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. मुंबई पुणे, नागपूर, गोवा अशा ठिकाणाहून नामवंत टेनिस जगतातील खेळाडू या मैदानावर आपला खेळ दाखवतात आणि त्याचा फायदा पंचक्रोशीतील सर्व क्रिकेट रसिकांना होत आहे.आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष केतन पवार, उपाध्यक्ष सचिन पाकळे, इतर सर्व ज्येष्ठ आणि कनिष्ठ सभासदांनी एकत्र येऊन स्पर्धेचे नियोजन केलं असून स्पर्धेची जोरदार तयारी सुरू केली आहे. मोजक्याच 16 संघांना या स्पर्धेमध्ये संधी दिली जाणार आहे. तरी अधिक माहितीसाठी गणेश सावर्डेकर (9923280095), देवराज गरगटे (797202510), प्रथमेश पवार (8087236994), उमेश राजेशिर्के ( 7972590073) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top