Tuesday, April 13, 2021 | 01:40 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

आबीटगाव येथे ‘खो-खो’चा जल्लोष
रत्नागिरी
28-Feb-2021 05:27 PM

रत्नागिरी

। चिपळूण । प्रतिनिधी ।

नुकत्याच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आबीटगाव, ता. चिपळूण (वरचीवाडी) येथे रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय पुरुष खुला गट नाईट खो-खो स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

या स्पर्धा दोन दिवस चालल्या. या स्पर्धेमध्ये जिल्हा भरातून 16 संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये चिपळूण तालुक्यातून एकदंत आबीटगाव, सोमेश्‍वर गावदेवी नांदगावच्या दोन संघांनी, तर राधाकृष्ण कोठारवाडी कोकरे, एस.पी. कॉलेज खरवते, वीर बंदर, दत्तकृपा कळवंडे अशा सात संघांनी सहभाग नोंदवला. तर, इतर तालुक्यांतून नऊ संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये संगमेश्‍वर तालुक्यातून मार्लेश्‍वर देवरुख, शिवछत्रपती स्पोर्ट्स अकादमी वांझोळे, छत्रपती शंभूराजे ग्रुप फणसवणे अशा तीन संघांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर राजापूर तालुका खो-खो असोसिएशन, जयभवानी पवारसाखरी गुहागर, शिवस्टार शेल्डि खेड, कुर्णे लांजा, काताळी गुहागर, युथ ऑफ रत्नागिरी अशा राज्य व राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या विविध तालुक्यांतील संघांनी स्पर्धेत आपला सहभाग नोंदवून ठसा उमटवला. 

स्पर्धेचे उद्घाटन तुरंबव गावचे उद्योजक आणि गुहागर-खेडचे आमदार भास्कर जाधव यांचे बंधू सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आबीटगाव, खांडोत्री गावाचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी दिपाली पांडे आणि पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव संदीप तावडे यांनी संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या. 

विजेत्या शिवछत्रपती स्पोर्ट्स अकादमी वांझोळे संघाला रोख रुपये 11 हजार 111 आणि आकर्षक चषक, तर उपविजेत्या लांजा संघाला रोख रुपये 7 हजार 777 आणि आकर्षक चषक देवून गौरवण्यात आले. यावेळी उत्कृष्ट संरक्षक म्हणून लांजा संघातील हर्ष माने या खेळाडूस आकर्षक चषक, तर उत्कृष्ट आक्रमक म्हणून वांझोळे संघातील निखिल सनगले या खेळाडूस आकर्षक चषक तर अष्टपैलू खेळाडू म्हणून वांझोळे संघातील साहिल सनगले या खेळाडूस आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी समालोचक रवींद्र घाणेकर आणि गोविंद मांडवकर यांनी मोलाची भूमिका बजावली. राष्ट्रीय पंच आणि या स्पर्धेचे पंचप्रमुख म्हणून प्रशांत देवळेकर यांनी काम पाहिले. त्यांना अंकुश चव्हाण, अरविंद भंडारी, विजय कलकुटकी, संतोष पवार, साबळे, मादिलवाड, खांडेकर या राज्य पंचांची साथ लाभली.

000000000000000000000000000000000000

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top