रत्नागिरी
चिपळूण । प्रतिनिधी ।
उभळे गावचे सामाजिक कार्यकर्ते, उभळे-तनाळी विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळकृष्ण ऊर्फ बाबाराम अर्जुनराव चव्हाण यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 88 वर्षाचे होते.
उभळे गावचे सरपंच व जिल्हा परिषद सदस्य या पदांवर काम करत असताना गावच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे मोठे योगदान होते. गावातील शेतक़र्यांना विकास सोसायटीचे माध्यमातून आर्थिक पाठबळ देण्याचे काम केले आहे. विकास सोसयटीची दुमजली इमारतीचे काम नुकतेच पुर्ण केले असून त्या इमारतीचा उद्घाटन सोहळा कार्यक्रम लवकरच होणार आहे. त्यानी चिपळूण तालूका खरेदी विक्री संघाचे अध्यक्षपदाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली होती. चव्हाण यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.
त्यांच्यावर रामतीर्थ स्मशान भुमीत अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उभळे गावातील ग्रामस्थांसह तालूक्यातील प्रा तष्ठीत नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली व नातवंडे असा मोठा परीवार आहे .