चिपळूण

केंद्र सरकाने इंधन दरवाढ कमी करण्यासंदर्भात चिपळूण शहर काँग्रेसच्या वतीने तहसीलदार कार्यालय चिपळूण येथे नायब तहसीलदार तानाजी शेजाळ याना निवेदन देण्यात आले.

यावेळी चिपळूण शहराध्यक्ष  लियाकत शाह, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर दाभोळकर,  सुरेश राऊत, नगरसेवक करामत मीठागरी, शहर उपाध्यक्ष राकेश दाते, अक्रम खान आदी उपस्थित होते. इंधन दरवाढीचे न पेलणारे ओझे केंद्र सरकारने जनतेवर लादून देशातील 130कोटी जनतेवर अन्याय केलेला आहे. पेट्रोल आणि डिझेलवर सध्या केंद्राचा 32 रुपये आणि राज्याचा 18 रुपये असा एकूण 50 रुपये इतका भरमसाठ कर आकारला जातो. परंतु 2014ला पेट्रोलवर 9.50 रुपये आणि डिझेलवर 4.50 रुपये इतकाच कर होता. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनीही दरवाढ केंद्र सरकारने मागे घ्यावी, म्हणून सरकारला विनंती केलेली आहे. सदर इंधनवाढ मागे घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने देशव्यापी जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचप्रमाणे चिपळूण शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या मार्फत माननीय राष्ट्रपती यांना निवेदन देऊन इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची विनंती करीत आहोत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 


अवश्य वाचा