Wednesday, May 19, 2021 | 03:05 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

चिपळुणमध्ये युवक काँग्रेसचा मेळावा यशस्वी
रत्नागिरी
30-Mar-2021 03:26 PM

रत्नागिरी

 

। चिपळूण । प्रतिनिधी ।

तुम्हाला निवडणुका लढवून जिंकायच्या असतील तर पक्षवाढीच्या तयारीला लागा. तुम्हाला तुमची ताकद दाखवावी लागेल. काँग्रेस पक्ष वाढीसाठी असे काम करा की पक्ष तुमच्या दारात येऊन तुम्हाला उमेदवारी देईल, असा सल्ला युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी युवक काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी चिपळुनात दिला. 

     हा मेळावा धवल मार्ट येथील सभागृहात झाला. यावेळी ते पुढे म्हणाले की, कोकणातील मधु दंडवते, अच्युतराव पटवर्धन, बाळासाहेब सावंत यांसारख्याना काँग्रेस पक्षाने काम करण्याची संधी दिली. या सर्वांना मानाची पदे देण्यात आली आणि या सर्वांनी देखील काँग्रेस पक्ष वाढीसाठी मेहनत घेतली. तसेच काँग्रेस पक्ष हा सर्वधर्म मानणारा पक्ष आहे.  या पक्षाने संख्येने कमी असणार्‍या बंजारा समाजातील वसंतराव नाईक, चर्मकार दलित समाजातील सुशीलकुमार शिंदे, अल्पसंख्यांक समाजातील बॅरिस्टर अंतुले यांना मुख्यमंत्री बनवले. यावरून काँग्रेस पक्ष हा जात-पात मानणारा पक्ष नाही. प्रत्येकाला आप-आपल्या धर्माचा अभिमान आहे. कोणी कोणावर धर्माबाबत सक्ती करू नये, असे आवाहन यावेळी केले. 

मोदी सरकार विरोधात टीका करताना देश संविधान वाचवायचे असेल तर लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही. या दृष्टीने चिपळुनातील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे, असे आवाहन केले.तरुण कार्यकर्ते नवीन पिढी काँग्रेस पक्षात आली तर काँग्रेस पक्ष होण्यास वेळ लागणार नाही असे देखील शेवटी सांगितले. चिपळूण काँग्रेसचे बेसिक तालुकाध्यक्ष प्रशांत यादव युवक कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याबद्दल सत्यजीत तांबे यांनी यादव यांचे कौतुक केले.

यावेळी व्यासपीठावर युवक प्रदेश सरचिटणीस सोनललक्ष्मी घाग, काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, युवक जिल्हाध्यक्ष अविनाश मोहिते,  काँग्रेसचे गुहागर तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर, माजी नगरसेवक सुरेश राऊत, विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव चव्हाण, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अन्वर जबले, महिला आघाडी तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, इम्तियाज कडू, विद्यार्थी संघटनेचे ऋषिकेश शिंदे, ज्येष्ठ कार्यकर्ते रफिक मोडक, कमलेश देसाई, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम, शहराध्यक्ष फैसल पिलपिले, सरफराज घारे, रुपेश आवले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top