Tuesday, April 13, 2021 | 01:19 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

छतावरून पडून कामगाराचा मृत्यू
रत्नागिरी
06-Apr-2021 07:33 PM

रत्नागिरी

खेड  । प्रतिनिधी ।

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लिटमस ऑरगॅनिक कंपनीच्या छतावर चढून काम करणारा कामगार तोल जाऊन खाली पडल्याने जागीच ठार झाला. अवधेश राहू निनाद (30) असे या दुर्दैवी कामगारांचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेश येथील असल्याचे सांगण्यात आले. ही घटना रविवारी घडली. आठवड्यापूर्वी याच औद्योगिक वसाहतीत एका कारखान्यात स्फोट होऊन पाच कामगारांचा मृत्यू झाला होता. आता आणखी एका कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्याने येथील कामगार सुरक्षित आहेत का? हा प्रश्‍न निर्माण होत आहे.  

कंपनीचे व्यवस्थापक कृष्णा सरोजिनी (22) यांनी याबाबत  लोटे पोलीस दूरक्षेत्रात दिलेल्या तक्रारीनुसार मयत अवधेश निनाद हा रविवारी सकाळी  सकाळी  10 वाजण्याच्या सुमारास लिटमस ऑरगॅनिक कंपनीच्या छतावर चढून पत्र्याचे काम करत होता. काम करत असताना अचानक तोल गेल्याने  अवधेश हा छतावरून जमिनीवर आदळला.या घटनेत अवधेश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली असून या प्रकरणी खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top