Wednesday, May 19, 2021 | 01:33 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

वामन पवार यांचे निधन
रत्नागिरी
06-Apr-2021 07:39 PM

रत्नागिरी

 चिपळूण । प्रतिनिधी ।

रत्नागिरी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वामन पवार यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले त्यावेळी त्यांचे वय 72.   त्यांच्या निधनाने रत्नागिरी जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.  

 त्याचे वय जरी झाले असले, तरी तरुणांना लाजवेल असे काम करत असत. त्याच्या अंगी जिद्द ध्येय चिकाटी पाहून तरुण पिढी त्याच जोशात काम करत असे त्याना त्यांचे चिरंजीव प्रशांत व शशांक यांनी मोलाची साथ दिली. भाजपच्या रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदावर काम करीत असताना भाऊनी पक्ष संघटना वाढवली त्याचबरोबर पक्षाच्या माध्यमातून तालुक्यात अनेक महत्वपूर्ण कार्यक्रम केले. त्यांना पिताशयाचा त्रास जाणवू लागल्यामुळे मुबंईतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली, मात्र लगेच त्यांना त्रास जाणवू लागला त्यामुळे तात्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले आणि याच दरम्यान ते कोमात गेले. सुरुवातीला काही महिने मुबंई तर त्यानंतर पुणे येथील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होत.े मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते, त्यामुळे सोमवार दि 5 एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगी, मुलगी सून जावई व नातवंडे असा परिवार आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top