Wednesday, May 19, 2021 | 01:36 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

खेड तालुक्यात लसीकरण कूर्मगतीने
रत्नागिरी
30-Mar-2021 03:24 PM

रत्नागिरी

 

। खेड। प्रतिनिधी ।

 तालुक्यात आरोग्य कर्मचार्‍यांच्या अनास्थेमुळे जागतिक महामारी कोरोनाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरणाचा वेग मंदावला असून दररोजच्या अपेक्षित लसीकरण होताना दिसत नाही.

 एक बाजूला तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृतांचा आकडा शतकी  वाटचलीकडे सरकत असताना कोरोना विषाणूशी लढा देणार्‍या फ्रंटलाईन असणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांच्या बेजबाबदार वर्तवणुकीमुळे तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षापुढील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांचा जीव धोक्यात टाकण्याचा प्रकार सुरू आहे. खेड तालुक्यात एकूण दहा लसीकरण केंद्रे कार्यान्वित असून यापैकी नऊ ठिकाणी  आठवड्यातून तीन वार लसीकरण करण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. तालुक्यात आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे, खेड नगरपरिषद दवाखाना व कळंबणी उपजिल्हा रुग्णालय अशा एकूण दहा ठिकाणी लसीकरण केंद्रे आहेत. यामध्ये जनतेसाठी करण्यात येणार्‍या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात मधुमेह, हृदयविकार, कँसर यासारख्या रोगांनी त्रस्त असणार्‍या 45 ते 59 या वयोगटातील आणि 60 पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. 

तालुक्यातील 45 ते 59 या वयोगटात सुमारे 7700 लाभार्थी असून 60 पेक्षा अधिक वयाचे 31423 असे एकूण 39123 लाभार्थी आहेत. यामध्ये तळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 4507, फुरुस केंद्रात 5843, कोरेगाव 3204, आंबवली 4436, लोटे 5027,वावे 3340,शिव बु 4006, तिसंगी 2300 व खेड नगर परिषद अंतर्गत  6460 लाभार्थ्यांचा समावेश आहे. 8 मार्च पासून कळंबणी उपजिल्हा रुग्णालय वगळता उर्वरित आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे व नगरपरिषद दवाखान्यात आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी लसीकरण करण्यात येत आहे. 24 मार्च पर्यंत झालेल्या तीन आठवड्यातील आठ दिवसांत तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालय वगळता उर्वरित नऊ केंद्रामध्ये 2945 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. वास्तविक दररोज 100 लाभार्थी असे एकूण नऊ केंद्रात 7200 लाभार्थ्यांना ही लस देने अपेक्षित असताना उद्दिष्टच्या केवळ 43 टक्के काम पूर्ण झाले आहे.  जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी खेड तालुक्यात कुरमगतीने सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेची कारणे शोधून उपाययोजना करणे आवश्यक आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top