Tuesday, April 13, 2021 | 12:48 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

खेडमध्ये लॉकडाऊनच्या संभ्रमावस्थेमुळे व्यापारी संतप्त
रत्नागिरी
06-Apr-2021 07:31 PM

रत्नागिरी

खेड । अजित जाधव । 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाच्या जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाची अमंलबजावणी सुरु होताच संभ्रमावस्थेत गेलेल्या खेडमधील व्यापारी संताप व्यक्त केला. दुकाने बंद करण्यासाठी प्रशासनाने पोलीसी बलाचाही वापर केला. मात्र त्यामुळे चिडलेल्या व्यावसायिकांनी दुकाने बंद करण्यासाठी गेलेल्या प्रशासकिय अधिकार्‍यांशी वादावादी करत दुकाने बंद केली तर आमच्या नोकरांचा पगार कोण देणार असे प्रतिप्रश्‍न उपस्थित केले.त्यामुळे खेड शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. खेड तालुक्यातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्‍वभुमीवर राज्य शासनाने  शनिवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 या दरम्यान कडक लॉकडाऊन घोषीत केले आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाला व्यापार्‍यांचीही संमत्ती होती. मात्र आज अचानक सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास खेडच्या प्रातांधिकारी अविशकुमार सोनोने, तहसिलदार  प्राजक्ता घोरपडे, पोलीस निरिक्षक निशा जाधव, खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी आपल्या सहकार्‍यांसह खेड बाजारपेठेत जावून व्यापार्‍यांना दुकाने बंद करण्यास सुरवात केली.

राज्य शासनाच्या आदेशानुसार स्थानिक प्रशासनाने दुकाने बंद करण्यास सुरवात केल्याने व्यापार्‍यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. संतप्त झालेल्या व्यापांना दुकाने बंद करण्यास विरोध दर्शवल्यानंतर प्रशासनाने पोलिसांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामुळे शहरातील व्यावसायिक  संतप्त झाले. दुकाने बंद ठेवायला सांगत असाल तर आमच्या दुकानांची आणि घरीची विजेची बिले, दुकानात काम करणार्‍या कामगारांचा पगार, दुकानाचे भाडे, व्यापर्‍याची देणी द्यायची असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित करत दुकानदारांनी दुकाने बंद करण्यास विरोध दर्शवला.

त्यानंतर सर्व व्यापारी आणि प्रशासकीय अधिकारी यांची नगरपालिका हॉलमध्ये बैठक झाली, या बैठकीला सुमारे 200 हून अधिक व्यापारी उपस्थित होते. या व्यापार्‍यांनी प्रातांधिकारी अविशकुमार सोनोने, तहसिलदार प्राजक्ता घोरपडे, पोलीस निरिक्षक निशा जाधव आणि मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे घेराव घालत अधिकार्‍यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. त्यावेळी प्रातांधिकारी सोनोने यांनी व्यापार्‍यांशी संवाद साधत आम्ही केवळ शासनाच्या आदेशाचे पालन करत आहोत असे सांगितले. मात्र व्यापारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. हॉटेल व्यवसायिकान तयार केलेल्या मालाचे करायचे काय? हा प्रश्‍न हॉटेल व्यवसायिकांनी उपस्थित केला. मात्र या प्रश्‍नाचे उत्तर प्रशासकिय अधिका कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करणे ही काळाची गरज असली तरी तरी ज्या पद्धतीने लॉकडाऊन लादला जात आहे, ते आम्हाला मान्य नाही. कोरोनाच्या नावाखाली गेले अनेक महिने बंद असलेला व्यवसाय आता  कुठे सुरु झाला झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा व्यवसाय बद करणे आम्हाला परवडणारे नसल्याने आम्ही दुकाने बंद ठेवणार नाही व्यावसायिकांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे अधिकार्‍यांची चांगलीच गोची झाली.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top