Monday, January 18, 2021 | 04:45 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

विहिरीत पडलेल्या बिबट्याला दिले जीवदान
रत्नागिरी
29-Dec-2020 03:15 PM

रत्नागिरी

वेंगुर्ला । वृत्तसंस्था ।

वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण येथील  सुरेश चव्हाण यांच्या राहत्या घरालगत असणार्‍या विहिरीमध्ये बिबट्या पडला होता.

वनविभागाच्या बचाव पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्यास पिज-याच्या साहाय्याने 35 ते 40 फूट खोल विहिरीतून यशस्वीरित्या सुखरुप बाहेर काढले, आणि सुखरूप पणे नैसर्गिक अधिवासात सोडले.

म्हापण येथील स्थानिकाकडुन आज सकाळी एका विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती आली. तत्काळ वनविभाग बचाव पथक घटनास्थळी निघाले. तो पर्यंत, सदर विहिरीमध्ये दोरखंडाच्या साहाय्याने लाकडी फळी स्थानिकांना विहिरीमध्ये सोडणेस सांगितले. त्याच्या आधाराने वन्यप्राणी बिबट्या फळीवर बसुन राहिला.

हा बिबट्या नर असुन अंदाजे 2 ते 2.5 वर्ष वयाचा होता. पथकाने ग्रामस्थांच्या सहाय्याने त्याला पिंजर्‍याने बाहेर काढले. त्या नंतर पशुवैद्यकीय अधिकारी कुडाळ यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केलेनंतर त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करणेत आले. सदर बिबट्या रेस्क्यू (बचाव) करणेकामी श्री. एस. डी.नारनवर, उपवनसंरक्षक सावंतवाडी,आणि श्री. आय.डी. जालगांवकर, सहा. वनसंरक्षक(खा. कु.तो. व वन्यजीव) सावंतवाडी यांचे मार्गदर्शनाखाली श्री.अ.पां.शिंदे, वनक्षेत्रपाल कुडाळ, श्री. धु.रा. कोळेकर.वनपाल नेरुर त. हवेली, श्री.चव्हाण वनपाल मठ, श्री. ना.फ. चव्हाण, वनपाल कडावल, वनरक्षक श्री. नरळे,श्री. मेहत्तर, श्री. सावंत, पोलीस पाटील श्री. बापसेठ पां चव्हाण वनमजुर श्री. मयेकर यांनी स्थानिकांच्या मदतीने बिबट्या बचाव कार्य यशस्वी केले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top