Tuesday, April 13, 2021 | 01:31 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

कंत्राटदार महासंघाचे 15 एप्रिलपासून काम बंद आंदोलन
रत्नागिरी
04-Apr-2021 04:50 PM

रत्नागिरी

। चिपळूण । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना यांची  दि .2 एप्रिल रोजी कंत्राटदारांचे विविध प्रश्‍न व समस्या बाबतीत राज्यातील पदाधिकारी व कंत्राटदार यांची बैठक झाली. सदर बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित खात्याचे मंत्री यांच्यासमोर संघटनेच्यावतीने अनेक मागण्यांची निवेदने देण्यात आली. पाठपुरावा केला परंतु शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. 

 त्यामुळे शुक्रवार, दि .15 एप्रिल पासून राज्यभर सर्व प्रकारचे शासकीय कामबंद आंदोलन व दि .3 मे रोजी राज्यभर भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा राज्य संघटनेच्यावतीने शासनास दिला असल्याची माहिती राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, जलसंधारण, जलसंपदा, नगरविकास विभागाकडील राज्यातील सर्व कंत्राटदारांची सर्व प्रलंबित देयके देण्यासाठीचा निधी शासनाने 15 एप्रिल 2021 पूर्वी सर्व विभागाकडे तात्काळ वितरित करण्यात यावा, राज्यातील या सर्व विभागांची नवीन प्रस्तावित कामे सदर कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा केल्याशिवाय काढू नये,  तसेच त्यांच्या निविदा प्रक्रिया अजिबात राबवू नये. प्रस्तावित नवीन कामांना शासनाच्या अर्थ विभागाकडून 50 टक्के निधीची तरतूद केल्याशिवाय व मंजुरी मिळाल्या शिवाय पुढील कोणतीही निविदा प्रक्रिया शासनाने अजिबात सुरू करू नये, 10 लाखाच्या आतील कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंता वर्ग, ओपन कंत्राटदार वर्ग यांना समप्रमाणात वाटप करावीत. राज्यातील सर्व विभागाकडील कामे करण्यासाठी एकच विभागाची नोंदणीकरण प्रमाणपत्र आवश्यक व बंधनकारक करावे. या पाच मागण्यांची पूर्तता शासनाने 14 एप्रिल पूर्वी करावी अन्यथा 15 एप्रिल पासून राज्यभर कामबंद केले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले, संजय मैंद, सुनील नागराळे, निवास लाड, विदर्भ अध्यक्ष सुबोध सरोदे, पुणे विभागीय अध्यक्ष सुरेश कडू-पाटील, मराठवाडा विभागीय अध्यक्ष अनिल पाटील, मुंबई विभागीय अध्यक्ष मंगेश देशमुख, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश पांडव, कोकण विभागीय अध्यक्ष प्रकाश पालरेचा व संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख कौशिक देशमुख आदींसह राज्य कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते .

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top