रत्नागिरी
। चिपळूण । प्रतिनिधी ।
पोलीस नागरिकांच्या सेवेसाठी असतात. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केलेच पाहिजे. मात्र पोलीस कर्तव्य बजावत असतापोलिसांवरना त्यात जर अडथळे आणले. त्यांच्यावर हल्ले केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा महाराष्ट्र पोलीस बाईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी दिला आहे. तसेच राहुल दुबाले यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे महाराष्ट्र पोलीस बॉईजसंघटनेच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सैफ सुर्वे यांनी रत्नागिरि जिल्ह्यामध्ये याचा जाहीर निषेध केला आहे. प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सैफ सुर्वे यांनी म्हटले आहे की, पोलीसांवर हल्ले करणारे कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंधित असो त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे .