Wednesday, May 19, 2021 | 01:23 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

अग्निशामन व्यवस्थेसाठी तहसीलदारांना निवेदन
रत्नागिरी
29-Apr-2021 05:34 PM

रत्नागिरी

। चिपळूण । प्रतिनिधी । 

चिपळूण फूड अँड ड्रग्ज कँज्युमर वेलफेर कमिटी तर्फे शहर आणि तालुक्यातील सर्वच हॉस्पिटलमध्ये अग्निशामनकरिता योग्य ती व्यवस्था कार्यान्वित करणेबाबत आदेश करावेत असे निवेदन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना देण्यात आले. संस्थेचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड.शशिकांत पिरदनकर,सचिन चव्हाण,देशमुख, दीप्ती भूरण यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.

राष्ट्रीय स्तरावर कार्य करणार्‍या या संस्थेचे मुख्य ध्येय मानवी आरोग्याची व समाजाची एकूणच सुरक्षितता हे आहे .ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी ग्राहकांना तांत्रिक ज्ञान,व्यवसायिक पैलू व कायदेशीर प्रक्रियेसह मोठ्या प्रमाणात शिक्षित करणे हा दृष्टीकोन आहे.सध्या कोरोना या साथीने देशभर थैमान घातलेले आहे.चिपळूण तालुक्यामध्ये देखील अनेक शासकीय तसेच खाजगी दवाखान्यामध्ये कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.मात्र सदर रुग्णालयामध्ये अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याकरिता आपण पूर्वीच योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

सद्या चिपळूणमध्ये कोविड हॉस्पिटल ठिकाणी अशा प्रकारची आगीची दुर्घटना घडल्यास संबंधित हॉस्पिटल प्रशासनाने कोणती खबरदारी घेतलेली आहे? किंबहुना अग्निशमन नळकांड्याची तरतूद करून ठेवलेली आहे अगर कसे? असल्यास त्या मुदत बाह्य तर झालेल्या नाहीत ना? याची चौकशी करून तसा सर्वच हॉस्पिटल मार्फत अहवाल मागवणे हे सध्या अत्यंत आवश्यक झालेले आहे.

अन्यथा कोणत्याही प्रकारची अग्नीसदृश्य दुर्घटना झालेस केवळ अशा प्रकारची व्यवस्था तकलादू असलेमुळेच नाहक रुग्णांना आपला जीव गमवावा लागणेची शक्यता नाकारता येत नाही. प्रसाशना मार्फत तालुक्यातील सर्वच हॉस्पिटल मध्ये अग्निशामनकरिता योग्य ती व्यवस्था कार्यान्वित करणेबाबत आदेश करून त्यांची अंमलबजावणी करवून घेणेत यावी.अशी मागणी या संस्थेने केली आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top