Wednesday, May 19, 2021 | 01:51 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सिद्धेश्‍वर पुस्तके यांची एसीबी स्कूलला भेट
रत्नागिरी
04-Apr-2021 04:29 PM

रत्नागिरी

। चिपळूण । प्रतिनिधी ।

कोकणात नावाजलेली शिक्षणक्षेत्रात अत्याधुनिक स्वरूपात  कार्यरत एसीबी इंटरनॅशनल स्कुलला अखिल भारतीय शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सिद्धेश्‍वर पुस्तके यांनी गुरुवार दिनांक 1 एप्रिल रोजी भेट देऊन संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत भोजने साहेब, चेअरमन अ‍ॅड.अमोल भोजने यांनी स्वागत केले.यावेळी सातारा जिल्हा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष मश्‍चिन्द्र मुळीक,सामाजिक कार्यकर्ते रमेश नलावडे आदी मान्यवर देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.

एसीबी इंटरनॅशनल स्कूलचा नावलौकिक पश्‍चिम महाराष्ट्रात देखील ऐकण्यास मिळत असल्याने पुस्तके यांनी आवर्जून संस्थेला भेट देऊन येथील उपक्रमांची माहिती घेतली.अल्पावधीच या संस्थेने चेअरमन भोजने यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक क्षेत्रात घेतलेली झेप आदर्शवत असल्याचे सांगून भविष्य उज्वल असल्याचे पुस्तके यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी नव्याने योजलेल्या शैक्षणिक उपक्रम , तसेच इतर सोयीसुविधा याबाबत देखील चर्चा झाली.संस्थेने उभारलेली प्रशस्त इमारत,संगणीकृत लॅब, प्रशिक्षित प्राध्यापक वर्ग,कर्मचारी वृंद आदींबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top