रत्नागिरी
चिपळूण । प्रतिनिधी ।
शौर्य प्रतिष्टान तर्फे शिवजंयती आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक - अध्यक्ष संजय रेवणे सचिव राहूल भगत,उपाध्यक्ष रवींद्र गवळी, यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या शिलेदारांना भगव्या वेशात आणि हाती शिवरायांची प्रतिमा असलेले भगवे ध्वज मोठ्या दिमाखात डौलत थेट गोवळकोट येथील गोविंदगडावर जाऊन शिवरायानां मान वंदना देण्यात आली.
शिवज्योत घेवून पैदल मिरवणूक,गोवळकोट ते चिपळूण नगरपरिषद, चिंचनाका,बहादूरशेख ,खेर्डीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शौर्य प्रतिष्ठानचे प्रधान कार्यालय माळेवाडी ,दसमान कॉम्प्लेक्स ,खेर्डी या दरम्यान मोठ्या उत्साहात भव्य - दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.शिवज्योतीचे आगमन झाल्यावर शौर्य प्रतिष्ठानचे रेवणे यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेला रूद्र अभिषेक करण्यात आला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रतिष्टांनच्या माध्यमातून ज्या बाळांना त्यांच्या आई वडीलांनी नाकारले आशा अनाथ अश्रमातील बालकांच्या संगोपनासाठी एक खारीचा वाटा म्हणून शौर्य प्रतिष्ठान तर्फे आनाथ आश्रमाचे सर्वस्वी जबाबदारी घेतली. भारतीय समाजसेवा केंद्र ,मार्कंडी ,चिपळूण या संस्थेचे मुख्य पदाधिकारी यांना आमंत्रित करून यांचेकडे आश्रमातील 24 बालकांचा एका महिन्यासाठी होणार्या खर्चाच्या रक्कमेचा धनादेश प्रतिष्ठान मार्फत सुपूर्द करण्यात आले.
शिवजयंती निमित्त प्रतिष्ठान तर्फे उपस्थित सर्व शिवभक्तांसाठी अल्पोआहार व भोजणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच सायंकाळी भजनांचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते.कार्यक्रमासाठी जयंद्रथ खताते, विजय शिर्के, अजित खताते, मुजिब पटाईत, विनोद भुरण,अभिजित खताते,सामाजिक कार्यकरते विनय (बाळा) दाते,संतोष उतेकर,अनिल लांजेकर,श्रीकृष्ण राऊत, विजय सुर्वे, अंकुश सकपाळ, आदी. सामाजिक व राजकीय मान्यवरांनी आपली उपस्थिती दाखवून महाराजांच्या प्रतिमेचे मनोभावे दर्शन घेतले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे रवींद्र गवळी,महेंद्र डिघे,राहूल भोसले (सरकार),समिर सकपाळ,नितीन शिगवन,शुभम मिरगल,अल्ताप चौगुले, आशिष उतेकर, परमानंद जंगम,संतोष भोसले,प्रियांका भगत,प्रिती गवळी,निकीता झेंडे, सौ.सकपाळ,आदींनी मेहनत घेतली.या कार्यक्रमाचे समालोचन रूपेश उतेकर यांनी केले तर प्रस्तावना सुनिल मोरे यांनी केली.