Wednesday, May 19, 2021 | 01:04 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

चिपळूणमध्ये खासगी लसीकरण बंद
रत्नागिरी
02-May-2021 04:08 PM

रत्नागिरी

| चिपळूण | प्रतिनिधी |

शासनाने खासगी हॉस्पिटलला लस देण्याचे बंद करून केवळ शासकीय यंत्रणेमार्फतच लसीकरण सुरू ठेवल्याने नागरिकांची फार मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. 1 मेपासून शासनाने खासगी लसीकरण बंद करून केवळ शासकीय ठिकाणीच लसीकरण चालू ठेवल्याने नागरिकांची मोठी गर्दी त्या ठिकाणी झालेली पाहण्यास मिळत आहे.

यापूर्वी खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण होत असल्यामुळे ही गर्दी विभागली जायची. तसेच ज्या रुग्णांना सशुल्क लस घ्यायची होती, ते खासगी हॉस्पिटलमध्ये घेत होते. परंतु, एक मेपासून खासगी हॉस्पिटलला शासनाकडून देण्यात येणारी लस बंद करून त्यांनी थेट कंपन्यांकडून लस खरेदी करण्याबाबत सूचना केल्या आहेत. परंतु, यासाठी कोणत्याही मार्गदर्शक सूचना नसल्याने खासगी हॉस्पिटल लस कोठून मिळवायची याबाबत संभ्रमात पडलेले दिसून येत आहेत. तसेच काही नागरिकांनी यापूर्वी खासगी हॉस्पिटलमध्ये लस घेतलेली असताना, दुसरी लस कोठे घ्यायची, हादेखील मोठा प्रश्‍न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. 

याबाबत शासनाच्या जिल्ह्यच्या ठिकाणच्या संबंधित व्यक्तींना संपर्क केल्यास त्यांनादेखील खाजगी हॉस्पिटलमध्ये लस मिळवण्यासाठी लस कंपनीत कोणाकडे संपर्क करायचा याबाबत ठोस माहिती नसल्यामुळे एकच गोंधळ उडालेला दिसून येत आहे. तरी याबाबत लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांनी समन्वय साधून खासगी हॉस्पिटलमध्ये लस त्वरित उपलब्ध होण्याबाबत प्रयत्न करण्याचे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top