Wednesday, May 19, 2021 | 02:14 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा ढिसाळ कारभार
रत्नागिरी
29-Mar-2021 07:08 PM

रत्नागिरी

। खेड । प्रतिनिधी । 

तालुक्यातील कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसिकरणासाठी स्वतः हुन येणार्‍या नागरिकांना वेगवेगळी कारणे सांगून परत पाठवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत खारी येथील ज्येष्ठ नागरिक गोपीनाथ पवार हे बुधवारी सायंकाळी चार वाजता कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी गेले असता त्यांना तेथे उपस्थित असलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी आम्ही तुमच्या एकट्या साठी लसीकरणाची व्हायल उघडू शकत नाही असे सांगून चक्क घरी पाठवले. यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी लसीकरणाठी गेले असता त्यांनाही आमच्या कार्यक्षेत्रातील सोडून अन्य नागरिकांना लस देत नाही तसेच याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांनी तोंडी आदेश दिल्याचे आरोग्य सहायिका प्रतीक्षा गावडे यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोरे यावेळी अनुपस्थित होते. तालुका आरोग्य विभागाकडे याबाबत चौकशी केली असता असे कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याची माहिती देण्यात आली. एकाच विभागाचे कर्मचारी लसीकरनासारख्या महत्वाच्या राष्ट्रीय मोहिमेत स्वतःच्या अक्कल हुशारीने लसीकरण मोहीम राबवत असल्याने तालुक्यातील लसीकरण मोहीम पूर्ण होण्यास आणखी किती वर्षे लागतील हे सांगणे अवघड झाले आहे. तालुक्यातील जनता लसीकरणाला साथ देत असताना केवळ आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांच्या अनास्थेमुळे ही मोहीम राखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील प्रत्येक केंद्रात दिवसात शंभर लोकांचे लसीकरण अपेक्षित असताना गेल्या तीन आठवड्यात झालेल्या आठ दिवसात केवळ सुमारे 41 टक्के लोकांना लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन आठवड्यात आठ दिवसात केवळ 348 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. शासकीय लसीकरण उद्दीष्ट अपेक्षित 800 लाभार्थी संख्या असताना सध्या स्थितीत केवळ उद्दीष्टच्या सुमारे 43 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. लसीकरण केंद्रातील कर्मचार्‍यांच्या लालफितीच्या कारभारामुळे व जनजागृती करण्यात अपयश आल्याने लसीकरण उद्दिष्टपूर्ती झालेली नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी खेड तालुजकयात कुरमगतीने सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेची चौकशी करून दोषी व उदासीन कर्मचार्‍यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top