Wednesday, May 19, 2021 | 01:41 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सुभाष कदम यांना लायन्स क्लबचा उत्कृष्ट सेवा पुरस्कार
रत्नागिरी
29-Mar-2021 07:05 PM

रत्नागिरी

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष, संत गाडगेबाबा परिट समाज संस्थेचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष, लोककल्याण ग्राहक संरक्षण मंचचे अध्यक्ष, समाजरत्न, पत्रकार सुभाष कदम यांना लायन्स क्लब चिपळूणतर्फे उत्कृष्ट सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात गेले 30 वर्षे कार्यरत असलेल्या सुभाष कदम यांना भारत सरकारचा युवा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी तंटामुक्त समितीचा कोकण विभागीय पुरस्कार, रोटरी क्लबचा प्राईड पर्सन पुरस्कार, लायन्स क्लबचा लायन्स गौरव पुरस्कार, राष्ट्रीय अंध कल्याण समिती (नँब) चा अंधमित्र पुरस्कार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूणचा गणेश भूषण पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव समिती सांगलीचा समाज रत्न पुरस्कार, पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. कोरोना काळात चांगले काम केल्याबद्दल, परिट संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे, भारत, भाजपा महिला मोर्च्या चिपळूण आदिंनी कोविड योद्धा म्हणून गौरव केला आहे. श्री. कदम विविध संस्थांचे पदाधिकारी असून ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांचे सामाजिक कार्याबद्दल व मिळालेल्या पुरस्कारांबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top