Wednesday, May 19, 2021 | 02:50 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

विलगीकरण अ‍ॅप व फ्री-टेलिमेडिसीनचा शुभारंभ
रत्नागिरी
29-Apr-2021 05:37 PM

रत्नागिरी

खेड । वृत्तसंस्था ।

हिराभाई बुटाला विचारमंचच्या वतीने महाराष्ट्रातील पहिली मकफ वर्ग खेड नगरपरिषदेसाठी गृह विलगीकरण अ‍ॅप व फ्री -टेलिमेडिसीन अ‍ॅपचा शुभारंभ खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष  वैभव खेडेकर यांच्या हस्ते पार पडला.

टेलिमेडिसीन अ‍ॅपचा वापर करून कोणताही रुग्ण आपला स्मार्ट फोन वापरुन डॉक्टरांना व्हिडिओ कॉल करू शकतो आणि विनामूल्य सल्ला घेऊ शकतो. प्राथमिक सल्ला घेण्यासाठी रुग्णाला बाहेर जाण्याची गरज नाही. आगामी काळात स्मार्ट फोनशिवाय ऑडिओ कॉलिंगची सुविधा देण्यात येणार आहे.ही सुविधा 24 तास उपलब्ध असणार आहे तसेच ताप,पल्स, ऑक्सिजन, खोकला, सर्दी, थकवा, रक्तदाब, मधुमेह इत्यादी गोष्टींचे मूल्यांकन घरी विलगीकरण केलेला रुग्ण स्वत: अ‍ॅपद्वारे साध्या क्लिकद्वारे करू शकणार आहे.

स्वत:च्या मदतीसाठी रुग्ण आपत्कालीन सतर्कता संदेश पाठवू शकतो,जो संदेश प्रभागनिहाय हेल्पलाईन क्रमांकावर पोहोचेल.तसेच रुग्णाला विलगीकरण वैद्यकीय किट मागवता येईल.या अ‍ॅपच्या प्रभागनिहाय डॅशबोर्डवर तसेच मुख्यालयातील वॉररूममध्ये एकत्रित डॅशबोर्डवर ऑक्सिजन, ताप इत्यादी सारख्या रुग्णाच्या लक्षणांवर व आरोग्याच्या स्थितीवर निरीक्षण करण्याची सुविधा उपलब्ध आहे.ज्या रुग्णांकडे स्मार्टफोन नाही,त्यांचे आप्तजन आरोग्य विषयक माहिती पाठवू शकणार आहेत

या वेळी दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम, श्री.कौस्तुभ बुटाला, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे,अमोल बुटाला, गटनेते अजय माने,ईलियास खतिब, मानसी चव्हाण,जयमाला पाटणे,सिद्धेश साळवी, राहुल पाटणे, मयु लाड, पूजा तलाठी,अंकुश मिर्लेकर,किशोर साळवी,आदी उपस्थित होते

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top