Wednesday, May 19, 2021 | 02:16 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

डीवायएसपींनी कापरे गाव दत्तक घेऊन दिला आदर्श
रत्नागिरी
02-May-2021 04:24 PM

रत्नागिरी

| चिपळूण | प्रतिनिधी |

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी यांनी दत्तक घेतलेल्या कापरे गावाची सलग दुसर्‍या दिवशी पाहणी केली. यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी गावात आरोग्य विभागाला सोबत घेऊन नागरिकांची विचारपूस करून आरोग्य तपासणीही केली. कामकाजाची माहिती घेतानाच परिसरातील स्वच्छता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.चिपळूणमध्ये कोरोना निर्बंधाच्या काळातदेखील आपल्या कामकाजाची चुणूक दाखवून आदर्श घालून दिला आहे.

 कोरोना पार्श्‍वभूमीवर येथील महसूल, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणेसह न.प. प्रशासन सतर्क झाले आहे. तालुक्यात शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. सौम्य लक्षणे असणारे रूग्ण घरीच उपचार घेत आहेत. कापरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय लसीकरण मोहीमसुद्धा तालुक्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर सुरू आहे. लसीकरणावरुन अलीकडे ग्रामस्थ व आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये शाब्दीक वाद होत आहेत. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण पोलीस ठाण्याच्या वतीने शहरासह ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या जात आहेत, तेथील कामकाजाचा आढावा घेतला जात आहे.

याच धर्तीवर नुकतीच येथील डीवायएसपी डॉ. सचिन बारी, पो.नि. देवेंद्र पोळ यांनी आपल्या सहकार्‍यांसह कापरे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. आरोग्य केंद्राची पाहणी केली. कामकाज, लसीकरण, स्वच्छता यांच्यासह कोरोनाबाधित रुग्णांची माहिती घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव, आरोग्य सहाय्यक निवेंडकर यांना काही सूचनाही केल्या. यावेळी सरपंच विजय बांद्रे, उपसरपंच दगडू कदम, ग्रा.पं. सदस्या आरती भुर्के, तंटामुक्ती अध्यक्ष अवधूत मारे आदी उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top