Saturday, March 06, 2021 | 01:54 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

रत्नागिरीत सात शिक्षकांना कोरोना
रत्नागिरी
22-Feb-2021 02:30 PM

रत्नागिरी

रत्नागिरी । वृत्तसंस्था ।

रत्नागिरी शहरातील फार्मसी कॉलेजमधील 7 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत.रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आता आरोग्य यंत्रणेची झोप उडालीय. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय आहे. याच महाविद्यालयातील सात शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. त्यामुळे सध्या या सात शिक्षकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु आहे.

औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय आज सुट्टीमुळे बंद आहे. मात्र, या महाविद्यालयातील शिक्षक पॉझिटिव्ह आढळल्याने चिंता वाढलीय. आरोग्य यंत्रणेच्या माध्ममातून या शिक्षकांच्या संपर्कात मुलं आली होती का याची माहिची घेण्याचं काम सुरु आहे.

खेड तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढलीय. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या वरवली गावात सतत रुग्णांची संख्या वाढतेय. वरवली गावात आणखी सहा रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते. पहिल्यांदा या ठिकाणी एकाच दिवशी 27 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यानंतर या गावात कोरोनाचा फैलाव वाढतो आहे. वरवली गावातील कोरोना रुग्णांची संख्या 50 च्या जवळ पोहोचलीय. खेड तालुक्यात फेब्रुवारीत महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा 68 वर गेलाय. वरवली गावाला लागून असलेल्या आंबवली गावातील हायस्कुलमधील दोन विद्यार्थी देखिल कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. त्यामुळे आंबवली हायस्कुल अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आलंय. तर कोरोनाची वाढती संख्या पाहून लवेल इथलं कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी आमदार योगेश कदम यांनी केली जिल्हा प्रशासनाकडे केलीय.

कोरोना रुग्णांची संख्या जिल्हा आरोग्य यंत्रणेची धाकधूक वाढवतेय. सध्या कोरोना रुग्णांचा आकडा कमी आहे. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलीय. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाचे केवळ 19 रुग्ण सापडलेत. पण कोरोनामुळे वाढणारी मृतांची संख्या आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी ठरतेय. जिल्ह्याचा मृत्यूदर राज्याच्या पहिल्या पाच मध्ये आहे. कोरोनामुळे मृतांची संख्या 359 वर गेलीय. तर, रत्नागिरी जिल्ह्याचा मृत्यूदर 3.66 टक्क्यांवर गेलाय.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top