Tuesday, January 26, 2021 | 08:40 PM

संपादकीय

लोकशाहीचा आत्मा जपावा

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत

रत्नागिरीत काँग्रेसने साजरा केला पक्षाचा वर्धापन दिन
रत्नागिरी
29-Dec-2020 03:19 PM

रत्नागिरी

रत्नागिरी । प्रतिनिधी । 

रत्नागिरीत काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आला. त्यानिमित्त काँग्रेस भवन इमारतीस विद्युत रोषणाई लाऊन इमारतीची शोभा वाढवण्यात आली होती. 

त्याचबरोबर देशभक्तीपर संगीत लाऊन पाहुण्यांचे स्वागत केले जात होते त्यामुळे काँग्रेस भवन परिसर गजबजून गेला होता. प्रथम पक्षाचा झेंडा फडकावला व झेंडावंदन करण्यात आले. तदनंतर काँग्रेस भवन ते टिळकांच्या स्मारक पर्यंत तिरंगा मार्च काढण्यात आला त्यावेळेस भारत माता की जय,वंदे मातरम्,अश्या घोषणांनी टिळक आळी परिसर दणाणून गेला होता.तदनंतर काँग्रेस पक्षाच्या वाटचाली वरती परिसंवाद आयोजित करण्यात आलेला होता.तसेच पंडित नेहरू ज्यावेळी रत्नागिरी ला आले असताना ज्यांनी हार घातला असे ज्येष्ठ कार्यकर्ते विजयराव खेर व काँग्रेस भवन इमारत बांधणारे म्हाडवला यांचे सुपुत्र लॉ कॉलेज चे माजी प्राचार्य ड राजशेखर मलुस्टे, ज्येष्ठ माजी नगरसेवक माई सुर्वे, सायकल वरून भारत भ्रमण करणारे शेर मोहम्मद शेख यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तदप्रसांगि प्रदेश काँग्रेसचे इब्राहिम दलवाई, जिल्हाध्यक्ष ड विजयराव भोसले, माजी आमदार हुस्नाबानु खालीपे, जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव जाधव,जिल्हा उपाध्यक्ष बरकत काझी,जिल्हा सरचिटणीस बंडू शेठ सावंत,जिल्हासरचिटणीस दिपक राऊत, जिल्हा चिटणीस अशपाक काद्री,जिल्हा चिटणीस माजी उप नगराध्यक्ष बाळा शेठ मयेकर,जिल्हा चिटणीस शब्बीर भाटकर,सेवादल जिल्हाध्यक्ष अन्वर काद्री, मिडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हरिष शेकसन,तालुका अध्यक्ष प्रसाद उपळेकर,शहर अध्यक्ष राकेश चव्हाण,तालुका अध्यक्ष दत्ता शेठ परकर,महिला जिल्हा उपाध्यक्ष स्नेहा पिलंकर, तालुका महिला चिटणीस सुस्मिता सुर्वे,महिला शहर अध्यक्ष रिझवाना शेख तालुका समन्वयक सचिन मालवणकर,अनंत शिंदे मनोहर पडवळ गजानन पिलंकार, काका तोडणकर,नंदा भालेकर,श्रुती सुर्वे इत्यादी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top