रत्नागिरी
रत्नागिरी । प्रतिनिधी
सध्या सर्वत्र थंडी असल्यामुळे अनेक ठिकाणी सकाळी धुके पसरलेले दिसते. मात्र हा अनुभव रत्नागिरी शहरात आज सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जे के फाईल्स च्या दरम्यान अनेक नागरिकांना पाहायला मिळाला मिळाला.
आजूबाजूच्या कारखान्यातील किंवा अन्य ठिकाणावरून कचरा जाळल्याने या परिसरात सायंकाळी चार वाजता एवढा धूर सर्वत्र पसरला होता की समोरून येणारी वाहनेही स्पष्ट दिसत नव्हती मात्र संबंधित यंत्रणेला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट होत आहे हा धुर नेमका कोठून आला हा आता संशोधनाचा विषय आहे. याबाबत डम्पिंग ग्राउंड मधील कचरा जाळण्यात आल्याने आग लागून हा धूर पसरला असावा असे अनेक नागरिकांनी यावेळी सांगितले.