रत्नागिरी
। खेड। वृत्तसंस्था ।
अनेक गंभीर गुन्हे करून सांगली पोलिसांना गुंगारा देणार्या 29 वर्षीय विकी गोसावी या मोस्ट वाँटेड आरोपीच्या येथील पोलिसांनी सापळा रचून जेरबंद करण्यात आले होते त्याच्या अटकेने सांगली जिल्ह्यातील तब्बल 6 गुन्हे उघडकीस येणार आहेत.
विकी गोसावी उर्फ विकास संतराम गोसावी याच्यावर सांगली जिल्हा हद्दीत गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. विकी हा 2014 पासून फरार होता. सांगली पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग मागावर होते परंतु तो वर्षानुवर्षे पोलिसांना गुंगाराच देत होता. कुपवाड, कुपवाड एमआयडीसी, सांगली शहर, महात्मा गांधी पोलीस स्थानक, संजयनगर पोलीस स्थानक आदी पोलीस.स्थानकांत त्याच्यावर 6 मालमत्तेविषयांसह अन्य गुन्हे दाखल आहेत.
या सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी सांगली पोलिसांना अपयशच आले होते. हा फरारी।गुन्हेगार भरणे येथे रहात असल्याची गोपनीय माहिती सांगली एल सी बी च्या पथका कडून मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस शिपाई विनय पाटील यांनी त्याच्या मुसक्या आवळून सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या ताब्यात दिले.