नाणीज 

मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबानजीक भोके बोंबलेवाडी (ता. रत्नागिरी) थांब्याजवळ कारने ठोकरल्याने निवळीचे दुचाकीस्वार अब्दुल हमीद ठार झाले. कारचा टायर फुटल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले. 

अपघाताची माहिती अशी, की वॅगनर कार एम. एच. 02 इआर-1610 मुंबईहून पाचालकडे चालली होती. त्यात रोहन संतोष पारदळे हे चालक होते. गाडी भोके बोंबलेवाडीे येथे येताच गाडीचा टायर फुटला व गाडी उजव्या बाजूने चाललेल्या दुचाकी एम-80 वर आदळली. त्यात दुचाकीचे चालक अब्दुल हमीद (मूळ उत्तर प्रदेश, सध्या रा. निवळी) गंभीर जखमी झाले.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच क्षेत्रनाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानची हातखंबा येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी आली. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमी अब्दुल यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

हमीद यांचा बेकरीचा व्यवसाय होता. ते निवळी परिसरातील गावांत एम-80 वरून त्याची विक्री करीत होते. अतिशय मनमिळावू, कष्टाळू माणसाचे, असे अपघाती निधन झाल्याने लोकांत हळहळ व्यक्त होत आहे. महामार्ग वाहतूक पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली. रत्नागिरी ग्रामीण पोलिस पुढील तपास करीत आहेत.

 

अवश्य वाचा