रत्नागिरी 

रत्नागिरी पूर्णगड मार्गावरील गावखडी फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ग्रामपंचायत सदस्यासह दोघे जण ठार झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. गुरुवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

महेश संभाजी शिवगण (38, रा. गावखडी, नानरकरवाडी) व जयेंद्र केशव गुरव (35, रा. गावखडी) अशी मृतांची नावे आहेत, तर प्रवीण गुरव हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जयेंद्र गुरव हे गावखडी ग्रामपंचायत सदस्य होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयेंद्र गुरव हे अ‍ॅक्टिवा (एमएच 08 एडी 5124) घेऊन गावखडी ते पावस असे जात होते. यावेळी त्याच्या दुचाकीवर प्रवीण गुरव मागे बसला होता. गावखडी फाट्यावर समोरून येणार्‍या महेश शिवगण यांच्या मोटारसायकलची (एमएच 04 एके 3945) त्यांच्या अ‍ॅक्टीव्हावर समोरासमोर धडक झाली.

या अपघातात जयेंद्र गुरव यांचा जागीच मृत्यू झाला, तर महेश शिवगण व प्रवीण गुरव दोघे गंभीर जखमी झाले. शुक्रवारी महेश याला उपचारासाठी कोल्हापूर येथे नेत असताना रुग्णवाहिकेतच त्यांचा मृत्यू झाला, तर प्रवीण याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद पुर्णगड सागरी पोलीस  ठाण्यात करण्यात आली आहे.

 

अवश्य वाचा