खोपोली 

खालापुर तालुक्यातील केळवली येथे एका आठ वर्षीय मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिडीतेच्या नातेवाईकांनी खालापुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

येथील एका 14 तसेच 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलांनी पिडीत मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तीच्यावर अत्याचार केला. या प्रकारानंतर तिला जिवे मारण्याची धमकीही मुलांनी दिली होती. या प्रकाराची माहिती तिच्या पालकांना कळताच त्यांनी खालापुर पोलिसठाण्यात धाव घेत आपली तक्रार दाखल केली.  मुलीच्या पालकानी दिलेल्या तक्रारीनंतर खालापूर पोलीस ठाण्यात  भा.दं.वि.क. 376 (2)(आय), 506 बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को) अधिनियम  2012 चे कलम 3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरिक्षक अंबिका अंधारे हे करीत आहेत.

 

अवश्य वाचा