Wednesday, May 19, 2021 | 02:37 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

युवा खेळाडूंना मिळणार मोफत क्रिकेटचे धडे
रायगड
02-Mar-2021 06:40 PM

रायगड

पनवेल | वार्ताहर

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने गावागावात आणि खेडोपाडी क्रिकेट खेळणार्‍या तरुणांना मोफत क्रिकेट शिकविणे, त्यांना खेळाचे मोफत साहित्य पुरविणे व त्यांच्यातील खरे खेळाडू पारखून त्यांना युवासेना संचालित व क्रिकेट असोसिएशन ऑफ तेलंगणा (सीएटी) तर्फे पुढील प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे.

तेलंगणा क्रिकेट असोसिएशनचे सुनील बाबू यांची ही संकल्पना असून, यात प्रसिद्ध क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांचे योगदान लाभले आहे. आदित्य ठाकरेंच्या आदेशाने युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई व शिवसेना सचिव सुराज चव्हाण यांच्या सूचनेने ही योजना लवकरच युवासेनेच्या माध्यमातून राबविली जावी, असे निवेदन मंगळवारी युवासेनेचे राष्ट्रीय सहसचिव रुपेश पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना दिले. यावेळी सीएटी यांनी दिलेली क्रिकेट बॅट आदित्य ठाकरेंना भेट देण्यात आली.

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top