नेरळ

  खालापुर तालूक्यातील लोधीवली कातकर वाडीतील एका आदिवासी विधवा महिलेचे कुडामेडीचे घर वादळी वार्‍यात कोसळले होते.पंतप्रधानी घोषित केलेल्या जनता कर्फु्यु च्या दिवसी 22 मार्च रोजी कोसळलेले घर आता प्रशासन उभे करीत आहे.पावसाळ्या पूर्वी ते घरकुल उभे राहणार असून बांधकामाचा  घरामूळे बेघर झालेल्या आदिवासी ताइ वाघमारे याचे घर प्रशानाच्या मदतीने पून्हा उभे राहणार असून खालापुर चे तहसीलदार  इरेश चपळवार यांनी त्या घराच्या बांधकामाचे भूमिपूजन केले आहे.

 घरकुलाचे कामाचे भूमिपूजन होण्याआधी तहसीलदार इरेश चपळवार यांनी जिल्हा आपत्ती निवारण निधीमधून प्राप्त झालेला सहा हजार रूपयांचा मदतीचा धनादेश लोधीवलीवाडीत जाऊन ताई वाघमारे यांना दिला,सोबतच कोरड्या धान्याच्या दोन किट सुद्धा दिल्या. यावेळी चौकचे तलाठी शिंदे, पोलीस पाटील किरण पाटील आणि वाडीतील नागरीक उपस्थित होते. तहसीलदार याचे हस्ते नारळ फोडून घरकुल बाधंकामास सूरूवात केली. ताई वाघमारे ही आदिवासी कातकरी समुहाची विधवा महिला असून त्याचे लोधिवली वाडी मध्ये  कुडामेडीचे घर होते हे घर 22 मार्च रोजी आलेल्या वादळात कोसळले होते.

 संबंधित महिलेचे घर कोसळल्यानंतर माहिती मिळताच दिशा केन्द्राचे कार्यकर्ते अशोक जंगले यांनी जिल्हा परिषद तसेच अदिवासी विकास विभाग आणि इतर शासकीय विभागांना या घटनेची माहिती दिली आणि मदतीचे आवाहन केले होते.संचारबंदी आणि नंतर लॉक डाऊन असताना सुद्धा तालूक्यातील आपले कामकाज सांभाळून मागील दोन महिन्यात तहसीलदार इरेश चपलवार यांनी ताई वाघमारे यांची भेट घेतली. तसेच त्यांना वेगवेगळ्या पध्दतीने मदत देखील दिली आहे.या घरकुलाचा प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अहिरराव यांनी घरकूल योजनेचा प्रस्ताव मंजूर करून जिल्हा परिषदेकडे पाठवला असून जिल्हापरिदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी मंजुरी दिली आहे.

  पावसाळ्यापूर्वी विधवा महिला ताई वाघमारे याचे घर उभारले जावे असे प्रयत्न सर्व शासकीय विभागाकडून केले जात आहेत अशी माहीती खालापुर चे गटविकास अधिकारी संजय भोये यानी दिली. लोधिवली गावचे पोलीस पाटिल किरण पाटिल ,तलाठी शिदे, स्थानिक आदिवासी कार्यकर्ते महेश पवार संजय सुभाष सागंळे, प्रदिप पवार,बाळू पवार या सर्वानी सामुहिक प्रयत्न व तहसीलदार याच्या मदतीने ताई वाघमारे हीचे घर उभे राहत आहे .

अवश्य वाचा