Tuesday, April 13, 2021 | 12:41 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पश्‍चिम विभागीय राष्ट्रीय मैदानी स्पर्धा
रायगड
28-Feb-2021 04:52 PM

रायगड

। माणगाव । वार्ताहर ।

रायपूर येथे दि.24 फेब्रुवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत आर्यन अरुण पाटील यास उंच उडी खेळ प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. विभागीय राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत आर्यन पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले होते. शालेय स्तरावर, तालुका, राज्य विभागाचे प्रतिनिधित्व केलेल्या आर्यनने अनेक स्पर्धांतून सहभाग घेतला आहे.

इंजमामुल खान, मंदार चवरकर व रामदास गाडे इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आर्यनने कसून सराव करून हे यश संपादन केले आहे. आर्यनचे वडील अरुण पाटील हे वनवासी कल्याण आश्रमशाळा माणगाव येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आर्यनला उंच उडीची आवड याच ठिकाणी निर्माण झाली. आर्यनचे मूळ गाव पेण तालुक्यातील रावे हे आहे. आर्यनने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल वनवासी कल्याण आश्रमशाळेचे शाळा समिती अध्यक्ष महादेव जाधव, महेश देशपांडे, संघटन मंत्री अमित साठे तसेच शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी आर्यनचे अभिनंदन केले आहे, तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top