Wednesday, May 19, 2021 | 02:11 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

वेंगसरकर यांचे क्रिकेटमधील योगदान अतुलनीय : संजय पाटील
रायगड
02-Mar-2021 06:35 PM

रायगड

मुंबई | प्रतिनिधी

भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे कर्णधार किंवा प्रशासक म्हणून भारतीय तसेच मुंबई क्रिकेटमधील योगदान अतुलनीय आहे, असे माजी फिरकीपटू आणि मुंबईच्या रणजी निवडसमितीचे सदस्य संजय पाटील यांनी म्हटले आहे. व्हेरॉक कप या 13 वर्षाखालील खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. 

ते पुढे म्हणाले, की वेंगसरकर यांच्यासह मुंबईने असेच काही महान क्रिकेटपटूही घडवले आहेत; पण केवळ स्वतःच्या खेळावर किंवा त्यानंतर समालोचनाद्वारे पैसे कमावणे अथवा स्वतःच्या मुलांचे या खेळात प्रमोशन करण्यातच काहींनी धन्यता मानली. मात्र, वेंगसरकर हे निवृत्त झाल्यानंतरही मुंबईला आणि पर्यायाने भारताला दर्जेदार खेळाडू देण्यासाठी झटत आहेत, असे माजी फिरकीपटू आणि मुंबईच्या रणजी निवडसमितीचे सदस्य संजय पाटील यांनी म्हटले आहे.  व्हेरॉक कप या 13 वर्षाखालील खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. रायझिंग स्टार संघाने संजीवनी क्रिकेट अकादमीवर दहा विकेट्सने विजय मिळवीत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

प्रथम फलंदाजी करणार्‍या संजीवनी क्रिकेट अकादमी संघाने हर्षवर्धन (43), अथर्व धोंड (34) आणि यश माळी (32) यांच्या योगदानामुळे 20 षटकामध्ये 5 बाद 128 धावांचे लक्ष्य उभारले. दैनिक सावे याने 22 धावांत 2 बळी मिळविले. या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांचा  स्टार फलंदाज आयुष मकवाना आणि अद्वैत के. यांनी 129 धावांची अभेद्य भागीदारी रचून संघाला दहा विकेट्सनी विजय मिळवून देत विजेतेपदावर आपले नाव कोरले. मकवाना याने केवळ 65 चेंडूंत 15 चौकारांसह नाबाद 86 धाव केल्या, तर अद्वैत याने 40 चेंडूंत नाबाद 39 धावा केल्या. मकवाना हाच अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला. विजेत्यांना संजय पाटील आणि दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक -  संजीवनी क्रिकेट अकादमी - 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 128 (हर्षवर्धन 43, अथर्व धोंड 34, यश माळी 32 ;  दैनिक सावे 22 धावांत 2 बळी ) पराभूत विरुद्ध  रायझिंग स्टार - 17.3 ओव्हर्समध्ये बिनबाद 129 ( अद्वैत के.  नाबाद 39, आयुष मकवाना नाबाद 86)

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top