Wednesday, May 19, 2021 | 02:08 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सोनारसिद्ध चषकावर वैष्णवी कोलाड संघाची बाजी
रायगड
28-Jan-2021 04:21 PM

रायगड

। धाटाव । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील क्रीड़ा क्षेत्रात नावाजलेल्या सोनारसिद्ध चषक भव्य क्रिकेट स्पर्धेमधे अखेर वैष्णवी कोलाड संघाने दमदार बाजी मारून हा संघ अंतिम विजेता ठरला.अंतिम फेरीत आगरी बॉइज संघाला पराजित करून वैष्णवी कोलाड संघ तब्बल सव्वा लाख व आकर्षक चषकाचा मानकरी ठरला. 

या स्पर्धेत एकूण 32 संघानी सहभाग दर्शविला होता.उपविजेता आगरी बॉइज रोठ खुर्द संघाला 70 हजार व चषक, तृतीय क्रमांक एम.आय.डी.सी.धाटाव संघाला 35 हजार तर चतुर्थ क्रमांक चषक दर्या किनारा अष्टमी संघाला 35 हजार व चषक अशी अनुक्रमे पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज विजय शेडगे,उत्कृष्ठ फलंदाज राणा मोरे तर मालिकाविर म्हणून योगेश पवार तर उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक वैभव शेलार याला घोषित करण्यात आले. सतत चार दिवस सुरु असलेल्या सामन्यांचे यूट्यूबच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आले होते. सामन्यांचे उत्तम समालोचन यासीन मर्चंट, इंब्राहीम बुखारी(भाईजान), उमेश साळुंखे आणि मुंढे यांनी केले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top