बोर्ली पंचतन 

श्रीवर्धन तालुक्यातील वडवली या गावामध्ये 17 मे रोजी खार मुंबई येथून आलेल्या 55 वर्षीय इसमाचा तसेच खुजारे या गावामध्ये प्रभादेवी मुंबई येथून आलेल्या 62 वर्षीय अशा 2 व्यक्तींचा संशयास्पद आकस्मित मृत्यु झाला होता.

तसेच दिघी येथील 23 वर्षीय तरुणीला कोरोनाची लक्षणे आढल्याने तिघांचे स्वॅब चाचणी करण्यात आली होती आज शुक्रवार सकाळी तिनही रुग्णांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले व तिनही रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह निघाल्याने श्रीवर्धन तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे.

दिघी , खुजारे व वडवली गावांच्या सीमा प्रशासनाने पुर्णपणे सिल केल्या असून दिघी येथील पॉझीटीव्ह रुग्ण व त्यांच्या च्या जवळील  संपर्कातील 4 तर वडवली येथील मृत व्यक्तीच्या संपर्कातील 9 जणांना जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे उपचारासाठी व तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. खुजारे गावातील मृत व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना देखील हॉस्पीटल मध्ये पाठविण्याची प्रक्रीया सुरु होती. या तिनही गावांची मुख्य बाजारपेठ असणारी बोर्ली पंचतन बाजारपेठ खबरदारी म्हणून तातडीने पुर्णपणे बंद करण्यात आली आहे.

श्रीवर्धन तालुक्यात मागील महिन्या मध्ये भोस्ते गावातील 5 व्यक्तींना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते त्यानंतर त्यांचेवर उपचार झाल्यनांनंतर ते सर्व रुग्ण निगेटीव्ह झाले होते व त्यांना हॉस्पीटल मधून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांनंतर श्रीवर्धन तालुका काल पर्यंत एकही कोरोना रुग्ण नव्हता.

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!