Wednesday, May 19, 2021 | 01:57 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

कसलखंडमध्ये रंगणार प्रिमियर रायगड लीगचा थरार
रायगड
31-Jan-2021 04:42 PM

रायगड

रसायनी । वार्ताहर ।

रसायनी-कोन रस्त्यावरील कसलखंड येथे रायगड जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडू, क्रिकेट प्रेमींसाठी कसलखंड सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रिडा मंडळाच्यावतीने रायगड प्रिमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. कसलखंड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणावर 2 ते 8 फेब्रुवारी दरम्यान या क्रिकेट सामन्यांचा थरार अनुभवता येणार आहे. आयोजकांकडून क्रिकेट सामन्यांचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. या लीगमध्ये खेळणार्‍या रायगड जिल्ह्यातील खेळाडूंचा लिलाव प्रक्रियाही पूर्ण झाली असून हे सामने 2 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहेत. रायगड प्रिमियर लीगफपाहण्यासाठी रायगडकरांना उत्सुकता लागली आहे.

दरम्यान अंतिम सामन्यात विजयी होणार्‍या संघास प्रथम पारितोषिक 1 लाख 5 हजार 555 व भव्य चषक, व्दितीय 1 लाख 4 हजार 444 व भव्य चषक, तृतीय 1 लाख 3 हजार 333 व भव्य चषक, चतुर्थ व पंचम प्रत्येकी 55 हजार 555 व भव्य चषक, मालिकावीर ठरणार्‍या खेळाडूस दुचाकी व चषक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व क्षेत्ररक्षक यांना फिटनेस सायकल व चषक देण्यात येईल. सामनावीर म्हणून कामगिरी बजावणार्‍या खेळाडूला हेल्मेट, गॉगल्स, वृक्ष व चषक देण्यात येईल, तर अंतिम विजेत्या संघास हेल्थ पॉलिसी आयोजकांकडून देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top