Wednesday, May 19, 2021 | 02:29 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

माणगावकर चषकाचा मानकरी ठरला सुपर सिलेक्टेड संघ
रायगड
28-Jan-2021 04:09 PM

रायगड

। माणगाव । वार्ताहर ।

मंगु स्टार क्रिकेट क्लब माणगावतर्फे मंगु जाधव यांनी आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून माणगावकर चषक 2021 व रोख 50 हजार रुपयांचे पारितोषिक सुपर सिलेक्टेड माणगाव संघाने पटकाविला.सदरील स्पर्धेत 32 नामवंत संघानी सहभाग घेतला होता.

माणगाव तालुक्यातील लहाने सुरव येथील मैदानावर मंगु स्टार क्रिकेट क्लब माणगाव यांनी क्रिकेट स्पर्धेचे शानदार आयोजन केले होते. या स्पर्धेतील उपविजेते ए-वन निजामपूर संघास रोख 25 हजार रुपये व आकर्षक चषक,तृतीय क्रमांकाचे विजेते रॉयल रोहा क्रिकेट संघास रोख 15 हजार रुपये व आकर्षक चषक तर चतुर्थ क्रमांकाचे विजेते उणेगाव क्रिकेट संघास रोख 10 हजार रुपये व आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून ए-वन निजापूर संघाचा संदीप कुर्मे,उत्कृष्ट गोलंदाज उणेगाव संघाचा ऋतिक चेरफळे तर मालिकावीराचा बहुमान सुपर सिलेक्टेड माणगाव संघाचा अष्टपैलू खेळाडू शुभम जाधव यांनी पटकावला.या सर्वाना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.स्पर्धेत हर्षद मुंढे रोहा किल्ला यांनी मराठीतून उत्कृष्ट्पणे धावते समालोचन केले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top