Tuesday, January 26, 2021 | 09:12 PM

संपादकीय

लोकशाहीचा आत्मा जपावा

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत

श्रीदत्तकृपा क्रिकेट संघ ठरला राम बंदरी चषकाचा मानकरी
रायगड
05-Jan-2021 03:41 PM

रायगड

 । कोर्लई । वार्ताहर ।

मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील सुरई येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात श्रीदत्तकृपा क्रिकेट संघाने बाजी मारत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवून कै.राम(तात्या) बंदरी चषकाचा मानकरी ठरल्याने तमाम क्रिकेट शौकिनांकडून विजयाचा जल्लोष करण्यात आला.

सुरई येथील श्रीदत्तकृपा क्रिकेट संघातर्फे कै.राम (तात्या) बंदरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नववर्षाच्या प्रथमदिनी तीन दिवसीय मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते विकास कातुर्डे, बोर्ली ग्रामपंचायत सरपंच मतीन सौदागर, उपसरपंच केतन जावसेन, पोलीस पाटील घोसाळकर, गावपंच जनार्दन पडवळ, नरेश चवरकर, जगन्नाथ कोकबनकर, दिनेश पडवळ, सागर कोकबनकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सामन्यांचे शानदार उद्घाटन करण्यात आले. सामन्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विकास कातुर्डे यांच्यातर्फे प्रथम क्रमांकाचे बक्षीस 20 हजार रूपये व चषक ठेवण्यात आले होते तसेच दुसर्‍या क्रमांकाचे 10 हजार रूपये व चषक, तिसर्‍या क्रमांकाला 5 हजार रूपये व चषक तर चौथ्या क्रमांकाला 3 हजार रूपये व चषक ठेवण्यात आले होते. या सामन्यात 32 संघांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता.

ताराबंदर येथील जयहनुमान क्रिकेट संघ व सुरईतील श्रीदत्तकृपा क्रिकेट संघ यांच्यात झालेल्या अटितटी व चुरशीच्या सामन्यात श्रीदत्तकृपा क्रिकेट संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक मिळवून राम बंदरी चषकाचा मानकरी ठरला. तर  दुसरा क्रमांक ताराबंदरच्या जयहनुमान क्रिकेट संघाने, तिसरा क्रमांक कोर्लईच्या फ्रेंड्स क्रिकेट संघाने तर वेताळवाडी-सुरई क्रिकेट संघाने चौथा क्रमांक मिळविला. यावेळी केतन नरहरी, पराग म्हात्रे, शिवतेज पाटील, संकेत सुतार यांनी पंच म्हणून काम पाहिले. तर सुशांत कोकबनकर व निगेंद्र राक्षिकर यांनी उत्कृष्ट समालोचन केले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top