Wednesday, May 19, 2021 | 02:40 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

श्री दत्त कॉलनी संघ ठरला विजेता
रायगड
28-Jan-2021 04:15 PM

रायगड

। कोलाड । वार्ताहर ।

रोहे तालुक्यातील जय बजरंग क्रीडा मंडळ हेटवणे व गोवे-खांब क्रिकेट असोशिअशन यांच्या संयुक्त विद्यमानाने गोवे येथील श्रीमती गीता द.तटकरे तंत्रनिकेतनच्या मैदानावर क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. यावेळी बिनदास्त खांब संघावर मात करून श्री दत्त कॉलनी संघ अंतिम विजेता ठरला आहे.

या सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते अविनाश निकम, युवासेना प्रमुख अमीर तेलंगे,गोवे माजी सरपंच नरेंद्र पवार,रोहिदास निकम,जय बजरंग क्रीडा मंडळ अध्यक्ष अनिल निकम,यशवंत निकम,सुरेश वालज,विलास निकम,युवराज निकम आदी मान्यवर उपस्थित होते.या क्रिकेट सामन्यात एकूण 16 संघानी सहभाग घेतला होता.यात प्रथम विजेता श्री दत्त कॉलनी,दुसरा क्रमांक बिनदास्त खांब,तृतीय अजय खांब,चतुर्थ हेटवणे यांनी पटकावला आहे.या सामन्याच्या यशस्वितेसाठी जय बजरंग मंडळातील सदस्यांनी मेहनत घेतली

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top