Tuesday, April 13, 2021 | 01:04 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

राजपुरीमध्ये शिडांच्या बोटींची स्पर्धा
रायगड
07-Apr-2021 04:00 PM

रायगड

 

। मुरुड । वार्ताहर ।

मुरुड तालुक्यातील राजपुरी येथे दरवर्षी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व एक विरंगुळा म्हणून शिडांच्या बोटींच्या शर्यतीचे आयोजन केले जाते. यंदा सोमवारी घेण्यात आलेल्या सदर स्पर्धेत 16 बोट मालकांनी भाग घेतला होता.सध्या कोविडच्या भीतीने पर्यटकांनी येथे पाठ फिरवली असून या स्पर्धेप्रसंगी त्यांची उणीव भासत होती. आयोजकांनी कोरोनाच्या सुरक्षितते संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून सदरची स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. सदर स्पर्धेत बोटींचे दोन गट पाडण्यात आले होते. प्रथम गटात शाहनवाज सईद यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक मुस्ताक फहीम यांनी व तृतीय क्रमांक मेहबूब हदादी यांनी पटकावला. दुसर्‍या गटातील प्रथम क्रमांक इरफान आदमने, द्वितीय अझीझ सरदार तर तृतीय क्रमांक फय्याज हदादी यांना मिळाला. कोरोनाचे नियम पाळून राजपुरीतील नागरिकांनी सदर स्पर्धेचा आनंद लुटला.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top