Tuesday, January 26, 2021 | 08:38 PM

संपादकीय

लोकशाहीचा आत्मा जपावा

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत

नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत रामनगर नागोठणे संघ विजय
रायगड
11-Jan-2021 02:26 PM

रायगड

सुतारवाडी, वार्ताहर

कोलाड विभाग नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पद्मावती नगर तलाठी कार्यालयासमोर वरसगाव येथे अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रामनगर नागोठणे संघ विजयी ठरला, तर जय भवानी चिंचवली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेचे उद्घाटन आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र वाचकवडे, उपाध्यक्ष सुशील महाबळे, सर्व कमिटी सभासद, कोलाड पोलीस ठाण्याचे पी.एस.आय श्री. जाधव, जि.प. सदस्य दया पवार, रोहा पंचायत समिती सदस्या सिद्धी राजीवले, वरसगाव सरपंच विशाखा राजीवले, आंबेवाडी उपसरपंच श्रीकांत चव्हाण, सदस्या  कांचन वाचकवडे,  सदस्य कुमार लोखंडे, सदस्य संजय राजिवले, सदस्य जगन्नाथ धनावडे, सदस्या प्रीती बेटकर, सदस्या अश्‍विनी गांधी, रुपेश महाबळे, राकेश शिंदे, सुशील शिंदे, अजित आंबुस्कर, गणेश वाचकवडे, राहुल शिंदे, शिरीष येरूणकर, अनिल निकम, किशोर मालुसरे, राजेंद्र वडे, सुमित महाबळे आदी उपस्थित होते. बक्षीस समारंभ आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम क्रमांक रामनगर नागोठणे 25,001 व चषक, द्वितीय क्रमांक जय भवानी चिंचवली रुपये 20,001 व चषक, तृतीय क्रमांक पद्मावती नगर वरसगाव रु. 10,001 व चषक, चतुर्थ क्रमांक स्वराज्य ग्रुप कोलाड रु.10,001 व चषक, मॅच ऑफ दि मॅच विनायक घाणेकर नागोठणे रामनगर, उत्कृष्ट फलंदाज सूर्यकांत येरूणकर चिंचवली, उत्कृष्ट गोलंदाज मनोज चिकणे नागोठणे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शुभम येरूणकर चिंचवली. या स्पर्धेत तालुक्यातील 16 स्पर्धक सहभागी झाले होते.

 
 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top